आता हिरवा चारा घरपोच,तोही वर्षभर

मुरघास

नवनवीन प्रयोग करून , दुग्ध - व्यवसाय फायदेशिर करणाऱ्या असंख्य शेतकरी बांधवाना मुरघासाची साथ....

मुरघास म्हणजे काय ?

नैसर्गिकरित्या तयार झालेल्या किंवा बाहेरून टाकलेल्या आम्लाच्या सहाय्याने हवाबंद स्थितीत जतन करून ठेवलेल्या हिरव्या चाऱ्याला मुरघास म्हणतात .

मुरघास का करावा ?

१) पावसाळ्यामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक उत्पादित झालेला हिरवा चारा मुरघासाच्या माध्यमातून टिकवून ठेवून उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्यांची कमतरता भरून काढता येते.२)वाढीव दूध उत्पनासाठी जनावरांना योग्य आहार देऊन आपण ७० टक्के पशुखाद्यांवर होणारा खर्च वाचवू शकतो.३)मुरघास-हिरवा चारा हे जनावरांचे नैसर्गिक अन्न आहे यामुळे दूध देणाऱ्या जनावरांना दूध उत्पादनात व त्याच्या गुणवत्तेत वाढ होते.४)नैसर्गिक चारा १२ माही उपलब्ध केल्यामुळे जनावरे आवडीने खातात,त्यामध्ये जास्तीत जास्त अन्नघटक असतात त्यामुळे दुधाची गुणवत्ता,जनावरांचे आरोग्य,जनावरांची प्रजनन क्षमता या सर्व गोष्टींमध्ये फायदा होतो.

मुरघासाचा वापर , फायदे व मर्यादा...

१) महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन दूध वाढण्यास व दुधामध्ये सातत्य टिकून राहण्यास मदत होते. जनावरांची भूक वाढते. २) जनावरांना लागणाऱ्या खुराकाची बचत होऊन खाद्यावर होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते...३) यातील तयार होणाऱ्या विविध आम्लांचा उपयोग शरीर पोषणासाठी होतो. अन्नघटकांची कमतरता भरून निघते. ४) मुरघास बनविण्याच्या पद्धतीमुळे पिकाखालील क्षेत्र मशागतीसाठी लवकर उपलब्ध होते. दुबार पीक घेणे शक्य होते. ५) हिरवा चारा कापून जनावरांना खाऊ घालताना त्यातील काही अन्नघटकांचे होणारे नुकसान मुरघासाच्या माध्यमातून टाळता येऊ शकते.

मुरघासासाठी कोणती पिके उपयुक्त ?

१) पीक लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे. २) पीक हिरवे आणि लुसलुशीत असावे.पिकाची फुलोरा येण्याआधीची अवस्था पीक कापणीसाठी योग्य असते.३) मुरघासासाठी निवडलेल्या पिकाचे खोड भरीव असावे.भरीव खोडाचे तुकडे व्यवस्थित होतात.अशा प्रकारच्या पिकांच्या खोडात भरपूर शर्करा व कर्बोदके असतात. ४) मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या चारा पिकामध्ये कापणीच्या वेळी पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. जर पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ४ ते ५ तास पीक उन्हात वाळू द्यावे जेणेकरून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

हिरवा चारा

मुरघास बनविण्यासाठी लागणारे साधने...

दशलक्ष टन हिरव्या चाऱ्याची गरज

दशलक्ष टन आज रोजी हिरवा चारा उपलब्ध

दशलक्ष टन ( 63% ) हिरव्या चाऱ्याची तूट

( टक्के %) दशलक्ष टन हिरवा चारा उपलब्ध

हिरव्या चाऱ्याची सद्यस्थिती , पुरवठा व मागणी आणि फायदे...

१०९७ दशलक्ष टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता असून प्रतक्ष मात्र ४०० दशलक्ष टन इतकाच हिरवा चारा जनावरांना उपलब्ध आहे.६९६ दशलक्ष टन म्हणजे ६३% हिरव्या चाऱ्याची मागणी अजूनही पुरवली जात नाही.असे असताना प्रति जनावर उत्पादन वाढीचे ध्येय कसे साध्य होईल हा एक यक्षप्रश्न आहे.शिवाय वाढत्या लोकसांख्यामुळे उपलब्ध शेजमिनीवर अन्नधान्य उत्पादनाचा ताण आहे.त्यामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यावर आणखी मर्यादा येत आहेत.

  • १) हिरवा चारा खाण्यासाठी रुचकर,लुसलुशित व रसदार असल्याने जनावरे आवडीने खातात व त्यांची भूक भागते.
  • २) हिरव्या चाऱ्यातून जनावराच्या शरीरास आवश्यक असणारे ग्लुकोज,फ्रुक्टोज,सुक्रोज मिळतं.सहजपणे विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा यातून होतो.यामुळे जनावरांना आवश्यक असणारी ऊर्जा लवकरात लवकर मिळते व जनावरे कायम ताजेतवाने राहते.
  • ३) हिरव्या चाऱ्यामधून जनावरांना ताजी,पोषक द्रव्ये त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात मिळतात.
  • ४) हिरव्या चाऱ्यात उपलब्ध असणारे अन्नघटक जनावराचे आरोग्य व त्यांची प्रजनन क्षमता चांगली राहण्यासाठी मदत करतात.हिरव्या चाऱ्याच्या उप्लब्धतेमुळे जनावरांच्या गाभण राहण्याच्या क्षमतेत वाढ होते.

ज्या जनावरांची दूध देण्याची क्षमता सर्वसाधारपणे १० ते १२ लिटरपर्यंत असते अशा जनावरांना पशुखाद्य न देता चांगल्याप्रकारे एकदल ७०% व द्विदल ३०% चारा दिला तर आपण एवढे दूध काढू शकतो.त्यामुळे पशुखाद्यावरील खर्चनिम्म्याने कमी करून पैश्यांची बचत होण्यास मदत होऊ शकते.

मुरघास कसा बनवावा ? मुरघासासाठी चारा पिकांची निवड...

मुरघास बनविण्याच्या पद्धती...

अ) पारंपरिक पद्धती ब) आधुनिक पद्धती :- १) प्लॅस्टिक बॅग सायलेज २) ड्रम सायलेज ३) बांबू सायलो

प्रतिटन कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पदार्थ :

  • १) युरिया - १ किलो
  • २) मीठ - १ किलो
  • ३) उसाची मळी किंवा गूळ - २ किलो
  • ४) खनिज मिश्रण - १ किलो

खड्डा / ड्रम / बॅग / बांबू सायलो इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लैस्टिकचा कागद झाकून उपलब्ध असणारा पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा वाळलेले गवत इत्यादी थर पसरून वरील घटक वेगवेगळे मोजून घेऊन १० ते १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. तयार झालेले मिश्रण कुट्टीवर शिंपडावे. चाऱ्याचा थर चांगला दाबून घ्यावा. कुट्टी व वरील मिश्रणाचे थरावर थर व्यवस्थित पसरवून कुट्टी व्यवस्थित दाबून घ्यावी. जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही. थर भरताना पायाने किंवा घूमस वापरून त्यातील हवा बाहेर काढावी. जर व्यवस्थित दाबून घ्यावी.जर हवा आत दाबून राहिली तर त्यामध्ये बुरशी होऊन मुरघासाची प्रत बिघडते,अशा प्रकारे तयार केलेल्या आच्छादनावर ४ ते ५ इंचांच्या मातीचा थर द्यावा.जेणेकरून मिश्रण हवाबंद स्थिती व्यवस्थित राहील.गरज भासल्यास वरून एकदा प्लॅस्टिक कापड झाकावे,त्यामुळे पावसाचे पाणी मुरघासमध्ये जाणार नाही.हवाबंद केलेला मूरघास हा ४० ते ५० दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.

मुरघासासाठी चारा पिकांची निवड :

  • १) पीक लवकर फुलोऱ्यात येणारे व लवकर तयार होणारे असावे.
  • २) पीक हिरवे आणि लुसलुशीत असावे. पिकाची फुलोरा येण्याआधीची अवस्था पीक कापणीसाठी योग्य असते
  • ३) मुरघासासाठी निवडलेल्या पिकाचे खोड भरीव असावे.भरीव खोडाचे तुकडे व्यवस्थित होतात.अशा प्रकारच्या पिकांच्या खोडात भरपूर शर्करा व कर्बोदके असतात.
  • ४) मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या चारा पिकामध्ये कापणीच्या वेळी पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.जर पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ४ ते ५ तास पीक उन्हात वाळू द्यावे जेणेकरून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल.

ॲझोला - जनावरांसाठी उत्तम खाद्य

ॲझोला हे निळे हिरवे शेवाळ जनावरांसाठी उत्तम खाद्य आहे.ॲझोलामध्ये २५-३५% पर्यंत प्रथिनांचे प्रमाण आहे.तसेच कॅल्शियम, लोह, तांबे, मॅग्रेशियम, बीटा कॅरोटीनचे प्रमाण इतर चाऱ्यापेक्षा जास्त आहे. ॲझोला खाद्यामध्ये पूरक म्हणून वापरता येते

ॲझोला करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :

  • १) सिलपॉलिन कागद
  • २) चाळलेली सुपिक माती
  • ३) रॉक फॉस्फेट पॉवडर
  • ४) ॲझोला कल्चर
  • ४) सुक्ष्मअन्नद्रव्ये

ॲझोला बनविण्याची पद्धत :

या पद्धतीमध्ये २.६ मी बाय १.६ मीटरचे सिलपॉलीन कागदाचे कृत्रिम तळे करावे.१०-१५ किलो चाळलेली सुपिक माती एकसारखेपणे त्या कागदावर पसरावी.एक किलो शेणखत घेवून ते १० लीटर पाण्यात मिसळावे आणि ते पाणी मातीवर टाकावे.रॉक फॉस्फेटची पावडर १० - २० ग्रॅम प्रति लिटर शेणाच्या स्लरी मध्ये मिसळावी आणि १० सेमी खोलपर्यंत डबक्यामध्ये पाणी टाकावे आणि त्यानंतर ०.५ ते १ किलो ॲझोलाचे शुद्ध कल्चर डबक्यामध्ये टाकावे.१० - १५ दिवसानंतर डबक्यामध्ये पुर्ण ॲझोलाची वाढ झालेली दिसून येते.त्यानंतर प्रत्येक दिवशी ०.५ ते १ किलो ॲझोलाचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.ॲझोलाची जलद गतीने वाढ होण्यासाठी प्रत्येक पाच दिवसांनंतर ५ ग्रॅम सुपर फॉस्फेट किंवा रॉक फॉस्फट आणि ५०० ग्रॅम शेणखत डबक्यामध्ये टाकावे त्यामुळे ॲझोलाचे दिवसाचे १ किलो उत्पादन मिळणे कायम राहते.सूक्ष्म अन्नद्रवांचे मिश्रण दर आठवड्याने डबक्यात टाकावे त्यामुळे ॲझोलाचे खनिजांचे प्रमाणात वाढ होते

लक्षात ठेवण्यासाठी काही ठराविक मुद्दे :

  • १) २५ से.पेक्षा तापमान कमी असावे.
  • २) सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी शेडींग नेटचा वापर करावा.
  • ३) तयार ॲझोला दर दिवशी काढल्यामुळे ॲझोला वाढ चांगली होते.
  • ४) डबक्याचा सामू ५.५ ते ७.० पर्यंत नियंत्रित ठेवावा.
  • ५) ॲझोलाची काढणी केल्यानंतर ताजे ॲझोला पुर्णपणे धुवून घ्यावे त्यामुळे शेणाचा वास जातो.

स्वच्छ ताजे ॲझोला गाईच्या खाण्यामध्ये सम प्रमाणात मिश्रण करुन दुभत्या जनावरांना खाऊ घालावे.दुभत्या जनावरांना ॲझोला खाद्य घातल्यामुळे १५ ते २०% पर्यंत दूध उत्पादन वाढते.

हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादन...

जमिनीची कमतरता व नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल त्यामुळे दिवसेंदिवस चारा पिकांचे क्षेत्र व जनावरांसाठी कुरणांचे क्षेत्र कमी होत आहे. याबाबींचा विचार करुन हायड्रोपोनिक तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याची निर्मिती करणे शक्य होते.या तंत्राद्वारे मका, गहु, बाजरी अथवा ओट या सारख्या हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येते.या तंत्राला माती विना शेती असे म्हणतात.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे फायदे :

  • १) कमी जागेत,कमी पाण्यात व कमी वेळेत स्थिर व सातत्याने चारा उत्पादन घेता येते.
  • २) मातीची आवश्यकता लागत नाही.
  • ३) चांगल्या प्रतीचा व उच्च दर्जाचा (जास्त प्रोटीन) चारा तयार करता येतो, त्यामुळे पशुखाद्याची बचत होते.
  • ४) दुध व फॅटचे प्रमाणात वाढ होते.
  • ५) मनुष्यबळाची व वेळेची बचत होते.
  • ६) काढणी अत्यंत सोपी आहे.
  • ७) वातावरणाचा, कीड रोगाचा कोणताही परिणाम होत नाही.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचे दैनंदिन कामकाज :

  • १) हंगामानुसार उगवणारा मका, गहु किंवा बाजरी बियाणे १२ ते २४ तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे. त्यानंतर मोड येण्यासाठी १२ ते २४ तास पोत्यामध्ये किंवा सुती कपड्यांमध्ये गुंडाळुन दडपुन ठेवणे.
  • २) त्यानंतर मोड आलेले किंवा फिगलेले बियाणे उपलब्ध असलेल्या १८ इंच लांब १२ इंच रुंद व ३ इंच खोल ट्रेमध्ये ४५० ते ५०० ग्रॅम बियाणे पसरवुन टाकणे.
  • ३) उपलब्ध बांबू, शेडींगनेट / बांबुच्या तट्याच्या सहाय्याने रॅक तयार करुन त्यावर ट्रे मांडावेत.
  • ४) गरजेनुसार जनावरांच्या संख्येच्या प्रमाणात प्रति जनावरासाठी सकाळी एक व सायंकाळी एक या प्रमाणे दररोज ट्रे भरुन संचामध्ये ठेवणे.
  • ५) आवश्यकतेप्रमाणे दिवसातून चार वेळा पाण्याचा शिडकाव करुन आर्द्रता राखणे.
  • ६) १० व्या दिवशी अंदाजे ९ ते १० इंच उंचीचे हायडरोपोनिकद्वारे वैरण तयार होते.

मुरघास व..

संबंधित साधने

silej

साईलेज ( मुरघास )

machine

साईलेज बेलर मशीन

harvest

साईलेज कापणी व वाहतूक

bag

साईलेज बॅग्स

विविध योजना व

शेतीविषयक माहिती

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३ कृषीक्षेत्र साठी ठळक मुद्दे

किसान क्रेडीट कार्ड

किसान क्रेडीट कार्ड,कृषी तंत्रज्ञान व कृषि उद्योजकतेमध्ये वाढ होण्यासाठी उपयुक्त माहिती

विषय : कीड व्यवस्थापन

वेगवेगळ्या लागलेल्या किडीचे व्यवस्थापन कसे करायचे

अर्थसंकल्प-कृषिविषयक घोषणा

२०२२-२३ या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय?

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ

बी -बियाणे , अवजारे , खते , रोपे व कलमे ( ॲग्रोमार्ट )

फुले कृषी विद्यापीठ

बी -बियाणे , अवजारे , खते , रोपे व कलमे , आणि बरेच काही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

दोन - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

राज्यस्तरीय योजना - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे. संकरित गाय

एकदिवशीय सुधारित पिल्लांचे गट वाटप

जिल्हास्तरीय योजना-एकदिवशीय सुधारित १०० पिल्लांचे वाटप करणे.

१००० मांसल कुक्कूट पक्षी- व्यवसाय

राज्यस्तरीय योजना-१००० मांसल पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय.

दोन - दुधाळ गायी / म्हशीचे वाटप

जिल्हास्तरीय योजना - दोन दुधाळ गाई / म्हशीचे लाभार्थींना वाटप करणे.

२५-तलंगा गट वाटप करणे

जिल्हास्तरीय योजना-८ ते १० आठवडे तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप

जिल्हास्तरीय योजना - शेळी / मेंढी गट वाटप

योजनेचे नाव -जिल्हास्तरीय लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे.

राज्यस्तरीय योजना- शेळी / मेंढी गट वाटप

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

अर्ज करण्याची तारीख वाढली आहे...

अधिक माहिती व पुढील माहिती साठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.

दालचिनी काढणी तंत्रज्ञान

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

लाल केळी उतीसंवर्धन

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

जैविक खते व जैवनियंत्रण

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

स्वच्छ दूध निर्मिती

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

सोनचाफा छाटणी तंत्रज्ञान

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

भातशेतीतील खेकडा नियंत्रण

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

जैविक खते व जैवनियंत्रण

राज्यस्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थींना १ गट वाटप.

इतर अधिक

माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या...

Tantradnyan

टेकनॉलॉजिस्ट फॉर यू

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

esilagelogo

ई - सायलेज

प्रोपेलिंग ग्रीन बिझीनेसेस

ऑनलाईन मुरघास व त्याआधारीत उद्योगातील खरेदी व विक्रीची बाजारपेठ

atmalogo

कृषि विभाग

शेतकऱ्यांच्या सेवार्थ

शेतीविषयक परिपूर्ण माहिती व त्या आधारित नवीन घडामोडी व नवनवीन योजनेसाठी

इतर अधिक

कृषीविषयक माहितीसाठी खालील अँप्लिकेशनला भेट द्या...

Tantradnyan

हापूस

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

काजू शेती

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

भात शेती

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

वनश्री

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

मत्स्यपालन

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

मासे जग

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

वनस्पती संरक्षण

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

Tantradnyan

काढणीनंतरचे तंत्रज्ञान

तंत्रज्ञान मित्र...

तंत्रज्ञान युगातील विविध योजनेच्या माहितीसाठी सर्वोत्तम युट्युब चॅनेल

काही

सतत विचारले जाणारे प्रश्न

  • मुरघास बनविण्यासाठी कोणती चारा पिके सर्वोत्तम आहे ?

    मुरघास बनविण्यासाठी मुख्यत्वे एकदल पिकांचा फुलोऱ्यात आल्यावर वापर केला जातो.ज्यावेळेस त्यात जास्तीत जास्त कर्बोदके असतात यात मका,ज्वारी (कडवळ) बाजरी व ओट (सातू) यांचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर द्विदल पिके जसे लसुण घास,बरशिम व चवळी यांचा मुरघासातील प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी १० ते १५ टक्के पर्यंत वापर केला जातो. * मका हे मुरघास बनविण्यासाठी सर्वोत्तम आहे ?

  • कुट्टी केलेला चाऱ्याच्या प्रत्येक थरावर दही,मीठ व गुळाच्या पाण्याचा शिडकाव करावा यासाठी १ टन मुरघासासाठी १ लीटर दही,१ किलो मीठ व १ किलो खराब गुळ किंवा मळी वापरावी हे द्रावण न वापरताही मुरघास बनविता येतो.

  • यासाठी जमिनीची आवश्यकता नाही ,पाण्याचा कमीत कमी वापर करून दुष्काळावर मात करता येते.अत्यंत अल्प खर्चात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन होते तसेच,२ गुंठ्यामध्ये ६ जनावरांचा चारा तयार होऊ शकतो व त्यांना तो पचनास सुद्धा उपयुक्त आहे.

  • ॲझोला दूध देणाऱ्या प्राण्यास दिल्यास दुधात व फॅट मध्ये वाढ होते,पक्ष्याना खाद्य म्हणून दिल्यास वजन व अंड्याचे उत्पादन वाढते. १५ ते २० टक्के आंबवण्यावरचा खर्चात बचत होते.एकूणच जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते आरोग्य सुधारते व आयुष्यात वाढ होते.

  • होय नक्कीच .! आपण आपल्या जनावरांसाठी बनवितो तसेच अतिरिक्त मुरघास बनवून त्याची विक्री सुद्धा करू शकतो.महाराष्ट्रामध्ये ६ ते ८ रु. प्रति किलो प्रमाणे मुरघासाची विक्री होते.अश्या पद्धतीने शेती सोबत जोड-व्यवसाय करून अतिरिक्त नफा साधला जाऊ शकतो.