
अर्थसंकल्प २०२२ चे कृषी आणि शासकीय योजनांबाबत ठळक मुद्दे :
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर १२.१ टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के वाढ झाली आहे.कृषी संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात ४.४ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी ३.० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.